मुंबई महापालिकेच्या निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का ! शिंदे सरकारचा मोठा निर्णय !

मुंबई महापालिकेच्या निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का ! शिंदे सरकारचा मोठा निर्णय !


मुबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडीला पुन्हा एका धक्का देण्याची योजना आखली आहे.

मुंबई महापालिकेच्या 12 हजार कोटींच्या कामांची कॅगकडून चौकशी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या 76 मोठ्या कामाचं ऑडिट करण्याची राज्य सरकारची विनंती कॅगने मान्य केली आहे. कॅग ही कोणत्याही सरकारी कामांची परीक्षण करणारी केंद्र सरकारची सर्वोच्च यंत्रणा आहे.

या कामांमध्ये कोरोना केंद्रांची उभारणी, रस्ते बांधणी, जमीन खरेदी प्रकल्प, भिंडीबाजार पुनर्विकास अशा महत्वाच्या कामांचा समावेश यामध्ये आहे. मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर ही चौकशी म्हणजेच ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई महानगर पालिकेने उभारलेल्या कोविड केंद्रात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी केला होता.

दरम्यान येत्या काही दिवसात महानगरपालिकेची निवडणूक आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हे मोठं पाऊल उचललं आहे. मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचार या मुद्द्यावर होणार असंही भाजपने व्यक्त केलं होतं.

मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचार प्रकरणात कोविडची कामे किंवा इतर कामे आहेत का याची चौकशी करण्याची मागणी याआधी भाजपने केली होती. त्याचबरोबर राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असल्यामुळं या मागणीला मान्यता मिळाली असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळं कॅगची चौकशी सुरू झाली आहे.

आता पुढच्या महिन्यात कॅगचे अहवाल समोर येऊ शकतात. ज्यामधून मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाला की नाही ते समोर येईल.

0 Response to " मुंबई महापालिकेच्या निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का ! शिंदे सरकारचा मोठा निर्णय !"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article