शिंदे-फडणवीस यांच्या भेटीनंतर रवी राणा बॅकफूटवर; वाद मिटला ?
गेल्या आठ दहा दिवसांपासून रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात सुरु असलेला वाद आता थांबलाय, कारण आमदार रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त करीत या वादावर पडदा टाकलाय.
आज रवी राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी, दिलगिरी व्यक्तकेलीय, मी माझे शब्द मागे घेतो. माझ्यामुळे गुवाहाटीला गेलेल्या आमदार आणि मंत्र्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आता विषय संपला आहे. असं सांगत वादावर पूर्णविराम पडल्याचं जाहीर केलं आहे.
आमदार रवी राणा यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी तीन ते चार तास चर्चा केली. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी 20 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी बच्चू कडू यांच्याबरोबरचा वाद संपला असून आम्ही एकत्रित काम करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
तसेच मी जसे शब्द मागे घेतले, त्याच पद्धतीने बच्चू कडूही आपले शब्द मागे घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आता बच्चू कडू कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्व्हाचे ठरेल.
पहा बातमी -
0 Response to "शिंदे-फडणवीस यांच्या भेटीनंतर रवी राणा बॅकफूटवर; वाद मिटला ?"
टिप्पणी पोस्ट करा