मुख्यमंत्री शिंदेंना मोठा धक्का ? “हा” मोठा नेता ठाकरे गटात परतणार, सुषमा अंधारे यांचा दावा

मुख्यमंत्री शिंदेंना मोठा धक्का ? “हा” मोठा नेता ठाकरे गटात परतणार, सुषमा अंधारे यांचा दावा

मुंबई : शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटात गेलेले संजय शिरसाट लवकरचं ठाकरे गटात परतणार असल्याचा मोठा दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय. संजय शिरसाट हे आमच्या संपर्कात असल्याचंही अंधारे यांनी म्हंटलंय. 

संजय शिरसाट हे शिंदे गटात अस्वस्थ आहेत, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या. संजय शिरसाट यांनी मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखविली होती मात्र त्यांना अजूनही मंत्री पदाची संधी मिळाली नाही. दरम्यान आमच्याकडून दोर कापले गेले नाहीत, मातोश्री सर्वांना जवळ करते.

मला असं वाटतं की, आता पहिल्यांदा परत येणारे कोणी असतील, तर ते संजय शिरसाट असतील.संजय शिरसाट सध्या प्रचंड अस्वस्थ आहेत. परेशान आहेत. त्यांची मंत्रिमंडळातही वर्णी लागली नाही, उलट, संभाजीनगरमध्ये अतुल सावे, अब्दुल सत्तार आणि सांदीपान भुमरे अशा तीनही लोकांना मंत्रिपदं मिळालीत. त्यामुळं संजय शिरसाट यांची मंत्रिपदाची आशा मावळली. असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

शिंदे गटाकडून काही कार्यकारिणीची पदं जाहीर झाली. त्यातही संजय शिरसाट यांना काहीही मिळालं नाही. त्यामुळं ते ठाकरे गटात परतणारे पहिले आमदार असतील, असा सुषमा अंधारे यांनी केलाय. आता खरच संजय शिरसाट नाराज आहेत का, ते पुन्हा ठाकरे गटात परतणार का हे येत्या काळात स्पष्ट होईल.

0 Response to "मुख्यमंत्री शिंदेंना मोठा धक्का ? “हा” मोठा नेता ठाकरे गटात परतणार, सुषमा अंधारे यांचा दावा"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article