MLA Santosh Bangar : आमदार संतोष बांगर अडचणीत येणार ! पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ
मुंबई : शिवसेनेचे हिंगोलीतील बंडखोर आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) त्यांच्या आक्रमक शैलीमुळे नेहमीच चर्चेचत असतात.आता नेहमीच आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत आलेत. संतोष बांगर यांचे नेहमीच सरकारी अधिकाऱ्यांशी खटके उडालेले आपण पाहिलेत. आता पुन्हा एकदा त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत वाद घातलाय. यावेळी त्यांनी थेट या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली आहे.
विशेष म्हणजे ज्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली आहे, त्याने याविषयी वरिष्ठांकडे लेखी तक्रार देखील केली असल्याचे समोर आले आहे. यामुळे आमदार संतोष बांगर अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं ?
27 ऑक्टोबर रोजी आमदार बांगर आपल्या कार्यकर्त्यांसह गार्डन गेटवरून मंत्रालयात जात असताना, तिथे ड्युटीवर उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना थांबून पासची विचारपूस केली. मात्र पासची विचारपूस केल्याने संतप्त झालेल्या आमदार बांगर यांनी संबधित पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. तर अशा पद्धतीने “आता तू मला शिकवणार का?” असे म्हणत बांगर यांनी वाद घालून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संबधित पोलीस कर्मचाऱ्याने या घडलेल्या घटनेबाबत वरिष्ठांकडे लेखी तक्रार देखील केली आहे.
दरम्यान याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार बांगर म्हणाले की, “मी कोणतेही शिवीगाळ केली नाही. तसेच पोलीस कर्मचाऱ्यासोबत आपला कोणताही वाद देखील झाला नसल्याचे आमदार बांगर म्हणाले आहेत. मात्र आपण गार्डन गेटने गेलो होतो हे आमदार बांगर यांनी मान्य केले आहे.
या अगोदरही संतोष बांगर यांनी घातला होत धुडगूस
अलिकडेच आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीत पीकविमा कार्यालयाची तोडफोड केली होती. पीकविमा कंपनीची आमदार बांगर यांनी पाहणी केली. त्यावेळी कोणताही अधिकारी उपस्थित नसल्याचं दिसून आले. बराच वेळ बांगर शेतकऱ्यांसह कार्यालयात थांबले होते. बांगर आणि शेतकऱ्यांनी अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे संतप्त शेतकरी आणि बांगर यांनी संतापाच्या भरात पीकविमा कार्यालयाची तोडफोड केली. काही महिन्यांपूर्वी बांगर यांना एका उपहार गृहात निकृष्ट दर्जाचे अन्न सापडले होते. तेव्हा संतोष बांगर यांनी उपहारगृह व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली होती.
हे हि वाचा : मुख्यमंत्री शिंदेंना मोठा धक्का ? “हा” मोठा नेता ठाकरे गटात परतणार, सुषमा अंधारे यांचा दावा
“सत्य कडूच असतं! राणा बोलले ते खरंच, ” सामनातून खोक्यांच्या वादावर भाष्य
0 Response to "MLA Santosh Bangar : आमदार संतोष बांगर अडचणीत येणार ! पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ "
टिप्पणी पोस्ट करा