राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आलेत. अन् आमच्यावर टिका करायला लागलेत; गुलाबराव पाटलांचा सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा
बाळासाहेबांच्या शिवसेनेला आजपर्यंत कित्येक लोकं सोडून गेलेत. परंतु आम्ही सोडून गेलो नाहीत. आम्ही तिला पक्क पकडून ठेवलं आहे. निवडणुक जिंकलो काय, निवडणुक हरलो काय, त्यासाठी तुरूंगातपण गेलो. तसेच आता कुठून राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आलेत. अन् आमच्यावर टिका करायला लागलेत. अस म्हणत त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावर देखील निशाणा साधला.
लोकं साधा ग्रामपंचयातमधील सदस्य सोडायला तयार नाहीत. आम्ही तर मंत्री पद सोडलं होतं. आम्ही शिवसेनेसाठी काम केलं. शिवसेनेच्या पहिल्या आमदाराला निवडणुक आणण्यासाठी आम्ही त्यावेळी कार्यकर्ते होतो. तसेच पुर्वीच्या वेळी राज्याच्या पोटी जन्माला आलेला राजा होत होता. आताचा राजा हा जनतेच्या मतपेटीतून जन्माला येतो. असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
ज्यावेळी 40 आमदारांनी उठाव केला होता. त्यावेळी त्यांनी विचार करायला हवा होता. त्यांनी त्यांची बाजू समजून घेतली पाहिजे होती. त्यामुळे आता कुटूंबशाहीचं राजकारण राहिलं नाही तर जनतेचं राजकारण सुरू झालं आहे. तसेच मी 22 हजार गावांना पाणी दिलं आहे . जिथे जिथे जालं तिथे फक्त माझंच नाव लागलं आहे. असंही ते म्हणाले.
0 Response to "राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आलेत. अन् आमच्यावर टिका करायला लागलेत; गुलाबराव पाटलांचा सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा"
टिप्पणी पोस्ट करा